शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रसिद्धी विषयक कामकाजाकरिता प्रत्येक विभागामध्ये नेमणूक केलेल्या “नोडल अधिकारी ” यांसाठी पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्क येथील सभागृहात प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी सोशल मिडिया चा प्रभावी वापर याविषयावर सुचिका पांडे यांनी मार्गदर्शन केले.
शासकीय विभाग व प्रसार माध्यमे समन्वय याविषयावर माहिती जनसंपर्क विभाग उपसंचालक पुरुषोत्तम पाटोदकर यांनी मार्गदर्शन केले. इंग्रजी माध्यमाचा प्रभावी वापर व प्रेस नोट याबाबत पत्रकार अर्चना दहिवाल यांनी संवाद साधला . दैनिक सकाळ संपादक सम्राट फडणीस यांनी शासकीय संस्था कडून माध्यमाच्या अपेक्षा व माहिती उपलब्धता याबाबत सविस्तर संवाद साधला. डॉ व्ही एल धारूरकर यांनी शासकीय संस्था आणि प्रसार माध्यमे याबाबत मार्गदर्शन केले यावेळी सहआयुक्त आशादेवी दुरगुडे ,माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रमुख रविकिरण घोडके ,उपायुक्त विठ्ठल जोशी ,संदीप खोत , मनोज लोणकर ,सहायक आयुक्त वामन नेमाने ,विजय थोरात ,उमाकांत गायकवाड, विशेष अधिकारी किरणं गायकवाड तसेच विविध विभागाचे नोडल अधिकारी आदि उपस्थित होते.