शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
संतपीठाच्या प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये पहिल्या सत्रातील कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, माजी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव व संतोष मोरे, ह.भ.प. माऊली महाराज साळुंखे, संतपीठ – चिंतन समिती सदस्य प्रकाश आबा आहेर, सामाजिक कार्यकर्ते किसनभाऊ बावकर, विनायक आबा मोरे, जितुभाऊ यादव व इतर शाळेतील प्राचार्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर दुसऱ्या सत्रामध्ये मा.आमदार महेश दादा लांडगे, पिं चिं.मनपा, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त शिक्षण विभाग श्री संदीप खोत, शिक्षणाधिकारी माध्यमिक तथा संतपीठ सचिव संजय नाईकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी पिं चिं मनपा पर्यवेक्षक विलास पाटील, कार्यालयीन अधीक्षक रोहिदास शेटे, संतपीठ अभ्यासक ज्ञानेश्वर गाडगे, तसेच सामाजिक कार्यकर्ते विकासभाऊ साने व आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करून उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला .
मा.आमदार महेश दादा लांडगे यांनी आपल्या भाषणामध्ये चिखली गावाचा विकास आणि संतपीठ याबद्दल अधिक विशेष सहकार्याचे आश्वासन दिले व ते साकारण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत असे आपल्या भाषणातून व्यक्त केले. तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी ही प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संतपीठ शाळेतील अभिवादनाच्या !! राम कृष्ण हरी!! या प्राचार्या डॉ.मृदुला महाजन यांनी सुरू केलेल्या सुंदर संकल्पनेचे विशेष कौतुक केले आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. संतपीठ सचिव संजय नाईकडे यांनी संतपीठ हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित स्वयं अर्थसहाय्य तत्वावर आधारित असून त्याबाबत अधिक माहिती दिली. संचालक श्री राजु महाराज ढोरे, संचालिका डॉ. स्वाती मुळे यांनी संस्थेचा ध्येय धोरणाची आणि कार्यपद्धतीची माहिती दिली.
प्राचार्या डॉ. मृदुला महाजन यांनी वार्षिक अहवाल सादर केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संतपीठातील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमात पुर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या संकल्पनेअंतर्गत गणेश वंदना, शिव राज्याभिषेक सोहळा, कोळी नृत्य, गोंधळ गीत तर प्राथमिक विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी ‘लोकल टू ग्लोबल’ या संकल्पने अंतर्गत टाळगाव चिखली या गावाचा इतिहास सांगणारी ‘टाळगाव चिखली’ ही नाटिका, आणि यांसारख्या विविध नृत्य, नाटक, गायन, वादन तसेच विविध कलागुणांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी या प्रसंगी केले.चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांनी आपापल्या कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करून पालकांची मने प्रफुल्लित केली. पालकांनीही सांस्कृतिक कार्यक्रमाचे तसेच शाळा, प्राचार्या, शिक्षकवृंद व विदयार्थी यांचे पारितोषिके, लिखित व मौखिक स्वरूपात प्रतिसाद देऊन कौतुक केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे संचालक, प्राचार्या,शिक्षक वृंद, पालकांचा, तसेच सर्व कर्मचारी यांचा सहभाग महत्त्वाचा ठरला. शाळेच्या संगीत शिक्षीका सौ श्रृती तनपुरे यांच्या सुमधुर स्वरात पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.