शबनम न्युज | पुणे
पुण्यातील सुसगावात एका जमीन व्यापाराच्या बंगल्यातून घरफोडी करून एकूण 32.65 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीस गेल्याची घटना घडली. ही घटना 24 डिसेंबर 2022 रोजी घडली असून, या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
अजय नानावत (वय 27 रा. करमोली, मुळशी), कन्हैया राठोड (वय. 19 रा. पाथरगाव, मावळ) आणि एक 40 वर्षीय महिला असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे 700 ग्राम सोन्याचे दागिने आणि 8 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यांचे आणखी तीन साथीदार फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद येथील एका 40 वर्षीय महिलेने अजय आणि कन्हैया कडून चोरीचे दागिने खरेदी केले होते. अजय हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे त्याच्यावर पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसात 48 गुन्हे दाखल आहेत आणि अटक केलेल्या महिलेवर देखील गुन्हेगारी रेकॉर्ड आहेत तिच्यावर गुजरात आणि महाराष्ट्र पोलीस सहा गुन्हे दाखल आहेत. या तिघांनी आणि त्यांचे आणखी तीन साथीदारांनी मिळून एका जमीन व्यापाराच्या बंगल्यातून घरफोडी करून 32 लाखांचा माल लंपास केला. याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.