शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारी हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. आज उमेदवारी अर्ज घेण्याचा पहिला दिवस या पहिल्याच दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे थेरगाव येथील कार्यालय ग प्रभाग येथे एकूण 20 जणांनी नामनिर्देशित अर्ज घेतले आहे. यामध्ये माजी नगरसेविका माया बारणे तसेच थेरगाव परिसरातील राष्ट्रवादीचे संभाजी बारणे यांच्यासह एकूण 20 जण चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास इच्छुक असल्याचे समोर आले आहे.
यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे 1, भाजपाचे 1, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 3, पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीचे 1, एमआयएम पक्षाचे 1, वंचित बहुजन आघाडीचे 1 आणि अपक्ष 12 असे एकूण 20 जणांनी नामनिर्देशित अर्ज घेतले आहे.
नामनिर्देशित अर्ज निवडणूक अधिकारी कार्यालयातून घेऊन जाणाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे –
माया संतोष बारणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
संभाजी बाळासाहेब बारणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
अनिल बाळू सोनवणे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
बायडाबाई उर्फ कल्पना सुखदेव काटे – भारतीय जनता पार्टी
प्रफुल्ल शैलेंद्र मोनलिंग – अपक्ष
हरिभाऊ उर्फ हरीश भिकोबा मोरे – अपक्ष
भोसले मिलिंद राजे – अपक्ष
रफिक रशीद कुरेशी – अपक्ष
वाळू तुळशीराम शिंदे – अपक्ष
राजेंद्र गणपत जगताप – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
रावसाहेब शंकर चव्हाण – पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी
जावेद शेख – एमआयएम
दादाराव किसन कांबळे – अपक्ष
वहिदासहेनु शेख – अपक्ष
अविनाश तुकाराम गायकवाड – अपक्ष
रवींद्र विनायक पारदे – वंचित बहुजन आघाडी
अजय हनुमंत लोंढे – अपक्ष
सुधीर लक्ष्मण जगताप – अपक्ष
बालाजी लक्ष्मण जगताप – अपक्ष
सालार भाई उमर साब शेख – अपक्ष