शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले. आरोपी अपघात वाहनचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. फुगे वाडी येथे सुखवानी गार्डन समोरील उड्डाणपुलावर रविवारी (दि. 5) दुपारी पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली.
Advertisement
पंकज पुंडलिक मोहिते (वय 27 रा.दापोडी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची मावस बहीण हे त्यांच्या दुचाकीवरून फुगेवाडी येथून जात होते. त्यावेळी चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिली.
Advertisement
Advertisement