शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
घटस्पोट प्रकरणी न्यायालयात दावा सुरू असतानाच पती-पत्नीचे किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यावरून पत्नीच्या माहेरच्यांनी पतीला, त्याचे आई-वडील आणि भावाला मारहाण केली. वाकड येथे रविवार (दि. 5) सकाळी ही घटना घडली.
Advertisement
राजेंद्र लक्ष्मण दगडे (वय 34 रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी याबाबत वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादीची पत्नी, सासू-सासरे भगवान घाडगे, मेहुना समाधान घाडगे (रा. परळी जिल्हा बीड) तीन महिला आणि तीन-चार अनोळखी महिला व पुरुष यांचे विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला .
Advertisement
फिर्यादी आणि आरोपी महिला हे पती-पत्नी आहेत. फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीचे किरकोळ कारणावरून शनिवारी भांडण झाले. त्या कारणावरून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमून मारहाण केली.
Advertisement