शबनम न्युज | पुणे
पुण्यातील नवले पुलाजवळ मोठा अपघात घडला आहे. या अपघातात ४७ वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक जण जखमी ही झाले आहे. ही घटना रविवार (दि.२०) रात्री ८ :३० च्या सुमारास घडली.
दरम्यान, या ठिकाणी अग्निशमन विभागाच्या ०२ रेस्क्यू वाहन काम करत आहेत. जवळपास ४७ हून अधिक गाड्यांचा हा अपघात असून ५० ते ६० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी सिंहगड पोलीस दाखल झाले आहेत.
Advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडे जाणारा मोठा कंटेनर हा भरधाव वेगात असताना नर्हे ते नवले ब्रिज दरम्यान अनेक वाहनांना धडक देत पुढे गेला अचानक झालेल्या या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत.