शबनम न्युज | मुंबई
“मी या चोरांना आव्हान देतो की, तुम्ही तो धनुष्यबाण चोरला आहे तोच धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला सामोरे या.. मग बघू जनता कुणाला निवडणार? ” असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.
शुक्रवारी निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. तसेच या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आम्ही धाव घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. त्यानंतर आज मातोश्री बाहेर उभे राहून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे.
ते म्हणाले, ““आज महाशिवरात्र आहे, मात्र आपलं शिवधनुष्य चोरीला गेलं आहे. या चोरांना आम्ही धडा शिकवणार आहोत. आपण सगळ्यांनी या चोरांना धडा शिकवू. मी या चोरांना आव्हान देतो आहे की, तुम्ही जो धनुष्यबाण चोरला आहे तोच धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला सामोरे या, मग बघू जनता कुणाला निवडणार?” असं खुलं आव्हानच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला दिलं आहे.