शबनम न्युज | आकुर्डी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विठ्ठल प्रतिष्ठान वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विठ्ठल प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष निखिल दळवी यांनी दिली आहे. सदर शिबिर रविवार (दि.19 फेब्रुवारी 2023 ) रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत संपन्न होणार आहे.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास ब्लूटूथ हेडफोन भेटवस्तू म्हणून दिली जाईल, तसेच सदर शिबिर दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांच्या जनसंपर्क कार्यालय शेजारी, विठ्ठल मंदिरासमोर, विठ्ठलवाडी, आकुर्डी पुणे येथे संपन्न होणार आहे. तसेच या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन निखिल दळवी यांनी केले आहे.
Advertisement
Advertisement