वाकड: दिनांक २०
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आणि परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल वाकडकर यांच्या वाकड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचार सभेनिमित्त धनंजय मुंडे शहरात आले होते. सभा संपल्यानंतर त्यांनी श्री विशाल वाकडकर यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या वाकड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. फटाक्यांची आतषबाजीत औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
मा. मंत्री धनंजय मुंडे हे महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी परिसरातील लहान थोरांपासून सर्वच नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. धनंजय मुंडे यांनीही सर्वांची आस्थेने विचारपूस केली.
या सदिच्छा भेटीवेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.