रॅलीत सहभागी होऊन पाठिंबा
नाना काटे यांच्या रहाटणी परिसरामधील कार्यालयापासून दुपारी 12 च्या सुमारास पिंपळे सौदागर व्यापारी असोसिएशनच्या वतीने उत्स्फूर्तपणे बाईक रॅली काढण्यात आली. पिंपळे सौदागर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष धनेश मुनोत यांच्या नेतृत्वाखाली पिंपळे सौदागर, रहाटणी फाटा, काळेवाडी, वाकड, थेरगाव या परिसरातून रॅली मार्गस्थ झाली. या रॅलीत शेकडो व्यापारी स्वत:हून सहभागी झाले होते.
राष्ट्रवादीच्या व्यापार-उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे, आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजय पिरंगुटे, आघाडीच्या महिलाध्यक्ष मोनिका जाधव, आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष राहूल जगताप, आघाडीचे पेदेस सचिव नीलेश शहा, प्रदेश उपाध्यक्ष केतन सदाफुले, आघाडीच्या पुणे शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रीती चढ्ढा, श्रीकांत कदम, राजकुमार माने, श्रीकांत पवार, मच्छिंद्र काटे आदी यावेळी उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाला व्यापारी वर्ग संपवायचा आहे. रिलायन्स मॉलला ग्राहक मिळवून देण्यासाठी कुटुंबातील सदस्यांचा मान मिळवणाऱ्या छोट्या व्यापारी वर्गाला संपविण्याचे षडयंत्र त्यामागे आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या अतित्वाची लढाई आता सुरू आहे. नाना काटे यांच्या विजयाची जबाबदारी आता घराघरात पोहोचलेल्या व्यापारी वर्गाने घेतली आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.