” कोण आला रे कोण आला; शिवसेनेचा वाघ आला ”..
सगळीकडे चर्चा फक्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जंगी आणि महादिव्य स्वागताचीच….
शहर शिवसेनेचे वातावरण पालटणार…
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२३) :- ” कोण आला रे कोण आला; शिवसेनेचा वाघ आला ” क्षणात चिंचवडगावातील मोरया हॉस्पिटल परिसरातील लिंक रस्त्यावरील नागरिकांचे या घोषणेने लक्ष विचलित केले. लोकं गोंधळून गेले. काय झाल असेल? यासाठी इकडे तिकडे पाहू लागले. तोच… समोरून शिवसेनेचे उपनेते तथा कामगार नेते इरफानभाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसैनिकांच्या लोंढ्याने समोरून येत असणाऱ्या चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या रोड शो च्या ताफ्याकडे कूच केली. कारण रोड शो चे खास आकर्षण होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे सर्वोसर्वा एकनाथजी शिंदे. मग लोकांनी एकदाचं हुशश केलं कारण हा सगळा खटाटोप होता एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठीचा. रोड शो चा ताफा दृष्टीक्षेपात येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे यांना चारी बाजूंनी गराडा घालत पुष्पगुच्छ, बुफे देऊन त्यांचे जंगी स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या गाडीला गराडा घातल्यामुळे काहीवेळ पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. यावेळी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे पाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिकांनी केलेल्या भव्य दिव्य स्वागतामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच भारावून गेले होते.
भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि. २२) चिंचवड मतदारसंघात भव्य रोड शो केला. गाडीतून जाताना लोकांना ते अभिवादन करत निघाले होते. तेव्हा कामगार नेते इरफानभाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली रवीभाऊ गोडेकर, किशोर जैद, प्रमोद शिंदे, प्रमोद शेलार, आजाद मुलानी, दत्ता आव्हरले, राहुल जगताप, पप्पू चौधरी, हैदर शेख, नवनाथ शेलार, शाकीर शेख, नूर शेख, इरफान पठाण, हैदर शेख, सागर राऊत, सोमा फुगे,नबी शेख, खंडू गवळी, पांडुरंग कालोखे, भिवाजी वाटेकर, मारुती कौदरे, सतीश कंठाले, सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, अशोक साबळे, गोरक्ष दुबाले, सुनिल सावळे,चंद्रकांत पिंगट, अविनाश जांभळे, अमृत शिंदे, बालाजी खैरे,अक्षय कदम, संदीप जाभले, न्यानेश्वर घनवट, विश्वजीत कदम,नागेश व्हनवटे, बबन काळे, समर्थ नाईकवडे श्रीकांत सुतार, सोमा फुगे, अमित पासलकर,चंदन वाघमारे, नाना नाइकवडे,शेकडो संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसैनिकांनी त्यांचा रस्त्यातच महासत्कार केला. प्रचंड जल्लोषात त्यांचे जंगी स्वागत केले. त्यांचे हे आदरातिथ्य पाहण्यासाठी रस्त्यावर तुफान गर्दी उसळली होती. लोकांची झुंबड उडाली होती. शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांवर फुलांचा वर्षाव केला. त्यावर शिंदे यांनी हात उंचावत सगळीकडे नजर भिरकावली. यावेळी शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता.
मुख्यमंत्र्यांसोबत रोड शोमध्ये भाजप-शिवसेना आणि मित्र पक्षाचे अनेक नेते सामील झाले होते. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार भरत गोगावले, आमदार उमा खापरे, भाजप प्रवक्ते एकनाथ पवार, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, यांच्यासह भाजप, शिवसेना व मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
——-
कोट…
” राज्यात नव्याने उदयास आलेल्या सत्तांतरानंतर राज्यातील राजकारणाचे चित्र पालटले आहे. राज्यात घडलेल्या या सत्तांतरानंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे. राज्यातील आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना वाढता प्रतिसाद बघता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीतही एकनाथ शिंदे यांचा करिश्मा पहायला मिळेल. शिवसेनेचे जुने-जाणते दिग्गज नेतृत्व इरफानभाई सय्यद यांनी उद्धव ठाकरे यांच्या कारभाराला वैतागून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ धरली आहे. त्यांच्याकडे पक्षाच्या उपनेतेपदाची आणि अल्पसंख्यांक विभागाची जबाबदारी शिंदे यांनी सोपविली. त्यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी सोपवणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.”