शबनम न्युज | पुणे
सांधे विकार,पचन संस्थेच्या विकारांचे व्यवस्थापन ‘ विषयावर पुण्यात वैद्यकीय मार्गदर्शन कार्यशाळेचे (सीएमई) चे आयोजन केरळ च्या ‘वैद्यरत्नम औषधशाला ‘ यांच्या ‘विश्रुथ ‘या प्रशिक्षण उपक्रमांतर्गत करण्यात आले होते.सांधे विकारांच्या व्यवस्थापनात केरळी चिकित्सेचे महत्व आणि पचनसंस्थेच्या विकारांच्या व्यवस्थापनात आयुर्वेदिक चिकित्सेच्या दृष्टिकोनाबाबत या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.दिलीप गाडगीळ यांच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन झाले. ‘वैद्यरत्नम औषधशाला फाउंडेशन ‘चे वरिष्ठ सल्लागार डॉ.जोस पैकदा यांनी ‘सांधे विकारांचे व्यवस्थापन ‘या विषयावर, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय(कन्नूर,केरळ)चे वैद्यकीय पर्यवेक्षक डॉ.एस.गोपालकुमार यांनी ‘पचन संस्थेच्या विकारांचे व्यवस्थापन ‘या विषयावर आणि डॉ श्रीरंग गलगली यांनी ‘मूत्रपिंड विकारांचे व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले.टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ मिहीर हजरननीस,’वैद्यरत्नम औषधशाला’ समूहाचे कार्यकारी संचालक डॉ.ई.टी कृष्णन मूस,प्रमुख व्यवस्थापक सुदेव पी. प्रमुख व्यवस्थापक डॉ.श्रीजीथ रवींद्रन,संतोष विश्वकर्मा यांच्यासह वैद्यकीय तसेच आयुर्वेदिक उपचार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.१२ मार्च रोजी हॉटेल प्रेसिडेंट(प्रभात रस्ता) येथे ही कार्यशाळा झाली.
आयुर्वेदाच्या प्रसारासाठी उपक्रम
‘वैद्यरत्नम औषधशाला’ ही केरळमधील नामवंत आयुर्वेदिक संशोधन,औषधोत्पादन संस्था असून ६०० वितरण केंद्रातून कार्यरत आहे. एलेदतू थैकटु मूस या केरळमधील नामवंत अष्टवैद्य घराण्याचा वारसा ‘वैद्यरत्नम औषधशाला’यांना लाभला आहे.अष्टवैद्यना आयुर्वेदाच्या आठ शाखांचे ज्ञान असते.’आयुर्वेद फर्स्ट’ या उद्दिष्ट घेऊन ही संस्था वेगवेगळे उपक्रम आयोजित करीत असते.