शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
अल्पवयीन मुलाकडून जबरदस्तीने चोरी केलेला मोबाईल जप्त करून तसेच त्याच्याकडून जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. ही कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी केली. खंडणी विरोधी पथकाकडील स्टार्फमार्फत उघडकीस न आलेले मोबाईल, जबरी चोरी गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना, पोलीस हवालदार सुनील कानगुडे यांना मिळालेल्या माहितीनुसार, वृंदावन हॉटेल जवळ, येवले अमृततुल्य समोर जाधव वाडी येथे सापळा रचून अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले.
रस्त्यावर पायी जाणाऱ्या महिलेचा मोबाईल हिसकावून घेऊन जाणाऱ्या अल्पवयीन मुलाला पिंपरी चिंचवड पोलीस यांनी अटक केली. त्याच्याकडून 10 हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. तपासादरम्यान, तो फोन चोरीचा असल्याचे मुलाने सांगितले. अल्पवयीन मुलाच्या विरोधात भा.द.वि. कलम 392 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पुढील कारवाईसाठी त्याला रावेत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास रावेत पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई विनय कुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. मनोज लोहीया, सह पोलीस आयुक्त, मा.डॉ.संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. डॉ. प्रशांत अमृतकर, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा.पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा.पो.उप निरी.अशोक दुधवणे, अमर राऊत, पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, सुनिल कानगुडे, निशांत काळे, रमेश मावसकर, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कु-हाडे, आशिष बोटके, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गायकवाड व प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने केली आहे.