विशेष लेख | गजाला सय्यद
प्रवास करीत असताना अनेक वाहने आपल्या नजरेच्या समोरून जातात. मात्र काही वाहनांकडे आपोआप आपले लक्ष वेधले जाते. ते असे वाहने असतात ज्यांच्यावर काही वेगळे पाहायला मिळते. जसे कि वाहन सुंदर दिसण्यासाठी अनेक लोक वाहनांच्या मागच्या बाजूस एखादे टेडीबियर, किंवा काही खेळणी ठेवतात. तर काही जणांकडे गडद रंगाचे वाहन पाहायला मिळते. जेणेकरून त्या वाहनांवर आपले लक्ष वेधले जाते. तशाच प्रकारे काही वाहनांवर वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह देखील असतात. जसे काही कार वर ‘L’ अशा चिन्हांमुळे आपले लक्ष आपोआप त्या वाहनाकडे जाते. काही जणांना या चिन्हाचा अर्थ माहित असतो, मात्र काहींना याचा अर्थ माहित नसल्यास वाहनावर या चिन्हांचा वापर का केला असेल? असा प्रश्न निर्माण होतो. तर फक्त कारच नाहीतर अनेक वेगवेगळ्या वाहनांवर वेगवेगळ्या प्रकारचे चिन्हांचा वापर करण्यात आलेला असतो. जे महत्वाचे असतात. त्यामध्ये ट्र्क वर असणारे ‘Horn Ok Please’ हे वाक्य आणि रेल्वे वरील ‘X’ किंवा ‘LV’ हे सर्व महत्वाचे चिन्ह आहेत. जे नेहमी वापरले जातात. या सर्व चिन्हांचे अर्थ आज आपण जाणून घेऊयात…
कारवरील ‘L’ चिन्हांचा अर्थ –
प्रवास करताना अनेक वेळा असे चिन्ह समोर येतात, काहीच वाहनावर असे चिन्ह का? असाही प्रश्न आपल्याला पडतो. तर कार या वाहनांवर ‘L’ या चिन्हाचा अर्थ म्हणजे इंग्रजी भाषेत ‘Lerner’ असा होतो तर मराठी भाषेत ‘शिकाऊ’ किंवा प्रशिक्षणार्थी चालकाचे प्रतीक संबोधले जाते. यामुळे रस्त्यावरील चालणारे या वाहनांसाठी अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. वाहन चालवणाऱ्या चालकाची पकड किंवा त्याची वाहन चालवण्याची पद्धत एवढी चांगलीशी नाही, हे दर्शवते. अशा वाहनांसाठी वेगळे नियम लागू करण्यात आले आहेत. प्रत्येक ड्रायव्हिंग क्लासेसच्या वाहनावर या चिन्हाचा वापर करण्यात येतो. जसे या वाहनातील चालक वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेत आहे हे निदर्शनात येते.
ट्रक वरील ‘Horn Ok please’ वाक्याचा अर्थ –
प्रवास करताना अनेकवेळा ट्रकच्या मागील बाजूस लक्ष गेले कि, काही ट्र्क वर असे चिन्ह दिसतात. तर वाटते कि नेमकं याला म्हणायचे काय? हॉर्न वाजवू नये किंवा तो हॉर्न वाजवू शकतो. यात गडबड होते. त्यामुळे कधी कधी या चिन्हाचा अर्थच कळत नाही. ट्रक या वाहनावर अनेकदा ‘हॉर्न ओके प्लीज’ हे वाक्य लिहिलेले असते. हॉर्न ओके प्लीज या वाक्याचा अर्थ कधी कधी ट्रक चालकालाही माहीत नसते. पण अनेक वेळा हे वाक्य वापरले गेलेले असते. महाराष्ट्र राज्य सरकारने ट्रकच्या पाठीमागे हे वाक्य लिहायला बंदी आणली होती. कारण त्यांच्या प्रमाणे हॉर्न ओके प्लीज लिहिणे म्हणजे हॉर्न वाजवण्यास प्रोत्साहन देणे, असे म्हटले गेले होते. त्यामुळे ट्रक चालकांना हॉर्न वाजवण्याचा पूर्ण हक्कच मिळतो.असे दर्शविले गेले, यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने या वाक्य लिहायला बंदीही आणली होती.
रेल्वेच्या शेवटच्या डब्यावरील ‘X’ किंवा ‘LV’ चिन्हाचा अर्थ –
तुम्ही कधी रेल्वेने प्रवास केला आहे का? किंवा नाहीही. तरी तुम्ही बऱ्याच गाड्या पाहिल्या असतील. तुम्ही पाहिलं असेल ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर एक खूप मोठा X लिहिलेला असतो. परंतु आपण कधी विचार केला आहे का की ट्रेनच्या शेवटचा डब्यावर इतका मोठा X का लिहिलेला असतो, याचा अर्थ काय आहे? ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर नेहमी एक खूप मोठा ‘X’ लिहिलेला असतो. या X चिन्हाचा अर्थ असा होतो की, तो या रेल्वेचा शेवटचा डब्बा आहे. तसेच दुसरे म्हणजे ‘LV’ हे चिन्ह देखील रेल्वेवर वापरण्यात आलेले असते. ‘LV’ या चिन्हाचा अर्थ ‘Last Vehicle’ (शेवटचा डब्बा) असा होतो. ही दोन्ही चिन्हे प्रामुख्याने रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी केली आहेत. एक्स किंवा एल लिहिलेला रेल्वेचा डब्बा शेवटचा डब्बा असल्याचे दर्शवितात.