सामाजिक कार्यकर्ते राहुल कोलाटकर यांची मागणी
शबनम न्यूज पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे प्रशिक्षित अनुभवी व प्रमाणित असलेल्या व्यक्तींनाच पोहण्याचे प्रशिक्षण शिबिर भरविण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे त्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की
, पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने चालवणयात येणाऱ्या जलतरण तलावावर सध्या उन्हाळयाचे दिवस असल्याने व मुलांच्या शाळेच्या सुट्टया लागल्या असल्याने सर्वच तलावावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते त्यामुळे लहान मुलांना गर्दी असल्याने पोहण्याचा आनंद घेता येत नाही .
पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने दर वर्षी पोहण्याच्या प्रशिक्षण शिबिरास हे तलाव देण्यात येते पण त्यामध्ये काही प्रशिक्षक हे अनुभवी व मान्यताप्राप्त प्रमाणपत्र धारक असतात तर काही जण तर कसलाही अनुभव नसलेले सुद्धा प्रशिक्षण शिबिर घेतात व त्यांना मान्यता ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने देण्यात येते माझी सदर निवेदनाच्या माध्यमातून प्रशासन यांना विनंती आहे की , संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये लहान मूले ही असतात त्यामुळे काही चुकीची घटना घडू नये याकरिता शिबिरासाठी मान्यता देताना प्रशिक्षकांची मान्यता प्राप्त प्रमाणपत्र तसेच अनुभव याची पडताळणी करूनच प्रशिक्षण शिबिर आयोजन करण्यास मान्यता द्यावी.
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या करिता पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने काही जलतरण तलाव निर्माण केले आणि अगदीं अल्प दरात तिकीट देऊन ते नागरिकांना वापर करण्यासाठी खुले करून दिले. नागरिक पण त्याचा आनंदाने वापर करतात . पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने त्याचा देखभाल दुरुस्ती खर्च पाहण्यात येतो तसेच जीवरक्षक यांचे मानधनही देण्यात येते. पण प्रत्यक्षात जे जीवरक्षक जलतरण तलावावर नेमले आहेत ते मान्यता प्राप्त संस्थेच्या वतीने प्रशिक्षित प्रमाणपत्र धारक आहेत का नाही ? याची पाहणी किंवा तपासणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या मार्फत करण्यात यावी जेणे करून सर्व जलतरण तलाव यामध्ये प्रशिक्षित व मान्यताप्राप्त प्रमाणपत्र धारक जीवरक्षक असतील.
सद्या शाळेला सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणावर लहान मुले हे जलतरण तलावावर पोहण्यासाठी जात असतात पण सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने तिकीट विक्री ही ऑनलाईन पद्धतीने चालू केली असल्याने लहान मुले व त्याच्या पालकांना नाहाक त्रास सहन करावा लागत आहे कारण ऑनलाईन पद्धत ही खूपच वेळकाढू आणि किचकट असल्याने ऑनलाईन सोबतच पूर्वी प्रमाणे ऑफ लाईन पद्धतिने पण जलतरण तलावावर तिकीट विक्री चालू करून तिकीट विक्री प्रक्रिया सुलभ करून देऊन मुलांना व नागरिकांना जलतरण यांचा आनंद घेऊ द्यावा.
मा.श्री.शेखरजी सिंह साहेब, आयुक्त आपणांस सदर निवेदनाच्या माध्यमातून विनंती आहे की , वरील निवेदनात उल्लेख केलेले मुद्दे किंवा मागण्या ह्या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी असून यावर योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेण्यात येवून नागरिकांना दिलासा द्यावा असे सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे