शबनम न्यूज (पिंपरी चिंचवड) प्रतिनिधी :
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठ मध्ये,मातंग साहित्य परिषद,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन,विद्यार्थी विकास मंडळ व समरसता साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने,सौ.प्रतिमा अरुण काळे,लेखिका,शिक्षिका,कवयित्री यांच्या ‘मी प्रतिमा माझी प्रतिमा ‘कविता संग्रहाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाड्•मय पुरस्कार -२०२३ ,कुलगुरू कारभारी काळे सर,मा.अनिरुद्ध देशपांडे सर,मा.आमदार सुनील कांबळे सर,पद्मश्री पुरस्कार विजेते मा.भिकुजीदादा इदाते,मा.रमेश पतंगे सर,मा.प्रभाकर मांडे सर,मा.धनंजय भिसे सर या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.याप्रसंगी कामगार भूषण कवी राजेंद्र वाघ,आणि डॉ.दीपक चांदणे उपस्थित होते.
सौ.प्रतिमा काळे यांचे हे पहिलेच पुस्तक व त्यास हा पहिलाच पुरस्कार आहे.त्यामुळे त्यांना अत्यानंद झाला.त्या सरस्वती माध्यमिक विद्यालय आकुर्डी पुणे,३५ या विद्यालयात माध्यमिक विभागात कार्यरत आहे.पुरस्कारामुळे त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.