पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील ड्रॅगन बोट असोसिएशन महाराष्ट्राची वार्षिक सर्वसाधारण सभा व निवडणूक एक एप्रिल रोजी चिंचवड येथे संपन्न झाली या निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी जी सी बेहरा, सचिव पदी डॉक्टर गोपीचंद शेट्टी, प्रज्वल कांबळे महासचिव गौरी गोपी शेट्टी तर खजिनदार ओमकार स्वामी तसेच सदस्य पदी दिशा पंजाबी यांची निवड झाली आहे
ड्रॅगन बोट असोसिएशन महाराष्ट्र हे ड्रॅगन बोट फेडरेशन ऑफ इंडिया संलग्न आहे आणि ड्रॅगन बोट फेडरेशन ऑफ इंडिया आंतरराष्ट्रीय ड्रॅगन बोर्ड फेडरेशन संलग्न आहे ड्रॅगन बोट असोसिएशन महाराष्ट्र चे माजी अध्यक्ष महेश थिटे यांनी नवीन निवडून आलेले संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या
Advertisement