शबनम न्यूज : मावळ
यशस्वी व्हायचं असेल तर मोबाईल पासून दूर रहा” असे आवाहन व्याख्याते विवेक गुरव यांनी विध्यार्थी, युवक – युवतींना यांना केले आहे
क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती शेलारवाडी येथे श्री. संत सावता महाराज मंदिराच्या प्रांगणात श्री. संत सावता माळी तरुण मित्र मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे समाजभूषण, व्याख्याते विवेक गुरव, मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. दत्तात्रय माळी, मंडळाचे मार्गदर्शक श्री. गुलाबजी माळी, श्री. भारत मामा गायकवाड यांनी प्रतिमेचे पूजन करून उपस्थित जनसमुदाय आणि मान्यवरांनी महात्मा फुले यांना अभिवादन केले.
यावेळी मावळ तालुक्याचे समाजभूषण, व्याख्याते विवेक गुरव यांनी उपस्थित विध्यार्थी, युवक – युवतींना ” मी यशस्वी होणारच…!” या विषयावर मार्गदर्शन केले. सावित्रीच्या लेकी कु. हर्षाली माळी हिने महात्मा फुले यांच्या विषयी माहिती सांगितली आणि समृद्धी माळी हिने कविता गायली. मान्यवरांचा स्वागत सत्कार श्री. वसंतजी शेलार आणि बाळासाहेब शेलार यांनी केला, सूत्रसंचालन किशोर माळी यांनी केले तर योगेश माळी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन श्री. संत सावता माळी तरुण मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले.