शबनम न्यूज ( पिंपरी चिंचवड ) : प्रतिनिधी
मिलिंद डान्स अकादमी वतीने १६ एप्रिल रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे कथक नृत्यसंध्या हा रंगारंग कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संचालक मिलिंद रणपिसे व अनिकेत ओव्हाळ यांनी त्रीदेवतानामस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात केली
यानंतर मिलिंद रणपिसे व शिष्य स्मितीन भोसले यांनी १२ मात्रांचा ताल चौताल सादर केला यामध्ये पारंपारिक बनारस घराण्याच्या बंदिशी त्यांनी सादर करुन रसीकांची वाहवा मिळवली. त्यानंतर नृत्यालयातील द्वितीय वर्षाच्या विदयार्थीनी रिदधी केंजळे, काव्या वासू, समन्वी बिरादार, शताक्षी कवडे, शरयू भोर, काव्या असलकर, रिश्या औटी, आव्या गुप्ता, अन्या चौधरी, यश्वी अग्रवाल यांनी खेळ मांडीयेला वाळवंटी घाई या तुकाराम महारांजाच्या अभंगावर कथक नृत्य सादर केले. त्यानंतर नृत्यालयातील तृतीय वर्षाच्या विदयार्थीनी सौ. वर्षा जाडकर, समीरा मोरे, मोनाली वासू, मानसी पाटील, प्रिती तराळे यांनी राग काफी मधील बिंदीश आज खेलो शाम संग होरी सादर करुन पारंपारिक कथक नृत्याने रसीकांची दाद मिळवली. त्यानंतर चतुर्थ वर्षातील विदयार्थीनी कु. अन्वी तराळे, आर्या असलकर व मैथिली शेगूनशी यांनी गगन सदन तेजोमय या प्रार्थनेवर अप्रतिम नृत्य सादर करुन प्रेक्षकांना मोहून टाकले. यानंतर सूफिया शेख, मुक्ता देशपांडे, ऋतुजा इंदूरीकर नंदिनी सृष्टी नाईक, भैरवी सरोदे यांनी राग मल्हार मध्ये त्रिवट सादर केला. यानंतर कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे कलाकार अनिकेत ओहाळ व ईशीता पाटील यांनी लखनौ घराण्याचा पारंपरिक तीनताल सादर केला यामध्ये पारंपरिक बंदिशी सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. यानंतर नृत्यातील द्वितीय वर्षांचे विद्यार्थी संगीता रणपिसे, वर्षा बंडे, रुची गुप्ता, बिन्दु नाईक, प्रहर्षिता नाईक, संध्या शर्मा, सोनाली शर्मा यानी राग मल्हार मधील संत तुलसीदास यांची रचना सादर केली. कार्यक्रमाच्या शेवटी स्मितीन भोसले यांनी कुचीपुडी या शास्त्रीय शैलीचे दर्शन घडविणारा तिल्लाना सादर केला त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाची सांगता अनिकेत ओव्हाळ व इशिता पाटील यांनी पंडित बिरजू महाराज यांची रचना असलेल्या दरबारी रागातील तराणा सादर करून केली. कार्यक्रमाचे निवेदन मानस साठे यांनी केले.या सर्व कार्यक्रमात साथ संगत करणारे कलाकार होते तबला -यश त्रिशरण, हार्मोनियम व गायन हरिभाऊ असतकर, पाखवाज पवन झोडगे, पढान्त अश्विनी जोशी, सिमरन भिसे. यांनी दिली व कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमास अनेक रसिकांनी हजेरी लावली