एस.एस. राजमौली यांच्या छत्रपती या चित्रपटातील ‘बरेली के बाजार’ या ट्रॅकचे अभिनेत्री नुश्रत भरुच्चा हिने अनावरण केले आहे.नुश्रतने आपल्या सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम हॅण्डल वर या गाण्याची एक झलक शहर केली आहे.
या गाण्याची एक झलक शेअर करताना नुश्रत लिहते की, “अखेर प्रतीक्षा संपली! #BareillyKeBazaar आता टाइम्स म्युझिकच्या YouTube चॅनलवर #ListenNow. असे तिने हे गाणे शेअर करत कॅप्शन लिहिले आहे. छत्रपती हे चित्रपट येत्या 12 मे 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
‘बरेली के बाजार’ हे गाणं सुनिधी चौहान आणि नकाश अझीझ यांनी गायलेले आहे तर या गाण्यात नुश्रत आणि अभिनेता बेलमकोंडा श्रीनिवास यांची भूमिका आहे. या गाण्यांमध्ये नुश्रत तीच्या सहकालाकार बेल्लमकोडा श्रीनिवास सोबत नृत्य करताना दिसत आहे. अभिनेता बेल्लमकोंडा श्रीनिवास हा ‘सीता’, ‘अल्लुडू अधुर्स’, ‘कवचम’ आणि इतर अनेक चित्रपटांमधील अभिनयासाठी ओळखला जाणारा तेलुगु अभिनेता आहे. छत्रपती या चित्रपटातून बेलम कोंडा हा बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.