शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट सिटी होत असलेले झपाट्याने वाढणारे शहर आहे. महानगरपालिकेने केवळ भारतातच नव्हे तर जगामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला असून याचे श्रेय आज सातत्त्याने कार्यरत राहणा-या अधिकारी व कर्मचा-यांना आहे. त्यामध्ये सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचा-यांचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते माहे एप्रिल २०२३ अखेर सेवानिवृत्त होणा-या ३२ तर स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या ६ अशा एकूण ३८ कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड,कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनसंपर्कचे माहिती अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे महादेव बोत्रे, उमेश बांदल, मंगेश कालापुरे, नाथा मातेरे, नंदुकुमार इंदलकर, तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.
माहे एप्रिल २०२३ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या ३२ अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा जावळे, मुख्याध्यापक अशोक उनवणे, रामचंद्र पिसे,दत्तात्रय दांगडे मुख्याध्यापिका विनता दगडे, सुजाता पांडे, सिस्टर इनचार्ज विजया पोतदार,लेखापाल प्रवीण बागलाणे, उपलेखापाल चंदन गंगावणे, कार्यालय अधिक्षक जयश्री साने, मनाली राणे, ब्लड बँक टेकिशियन पौर्णिमा ठकार, फार्मासीस्ट दिलीप वारभुवन,वीज पर्यवेक्षक विकास जगताप, लिपिक दिनेश मालशे, इले.मोटार ऑपरेटर छत्रपती यादव, सुरक्षा सुपरवायझर सुनील जगताप,विश्वनाथ काळे,रखवालदार विठ्ठल गोसावी, वाहन चालक तुकाराम नढे, प्लंबर विजय लोंढे, मुकादम संजय जगताप, वॅार्ड बॉय नंदू गावडे, शिपाई अरुण संभेराव, अशोक शिंदे, मजूर महादू वाळुंजकर,सुर्यकांत सातभाई,नितीन गोसावी,दिलीप पिंजण, ज्ञानेश्वर तापकीर, सफाई कामगार विठाबाई शिंदे,गटरकुली सुरेश जगताप यांचा समावेश आहे.
तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ६ कर्मचा-यांमध्ये सफाई कामगार अनिता आल्हाट, माया सौदे गटरकुली गौतम रणदिवे ,रमेश वाघमारे, कचरा कुली भगवान शिरोळे, स्प्रे कुली सुर्यकांत जगताप यांचा समावेश आहे.
अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले आज सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचा-यांनी महानगरपालिकेत ३०-३२ इतकी वर्ष सेवा पूर्ण केली आहे. यासर्वांनी प्रामाणिकपणे आनंदाने व उत्साहाने महानगरपालिकेच्या विविध विभागात सेवा करून महापालिकेचा पाया मजबूत केला आहे. त्यांचेप्रती कृतज्ञता व्यक्त करून जगताप यांनी सेवा निवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचा-यांना पुढील आरोग्यमय आणि आनंदी वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या तसेच सेवेत असताना करीत असलेले लोकसेवेचे कार्य सेवानिवृत्तीनतंर ही असेच सुरु ठेवावे असे मतही त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी केले, सूत्रसंचालन जनसंपर्क विभागाचे माहिती अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर आभार विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी मानले.