सुमारे 7 लाख रुपये किंमतीचे सोन्या – चांदीचे दागिने हस्तगत
प्रतिनिधी | मोसमी केवट
दिघी : चोविसावडी चाऱ्हेली दिघी परिसर येथे 26 ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्यांनी तब्बल 6 ठिकाणी घरफोडी केल्याची धक्कादायक घटना घडली. चोरट्यांनी सुमारे 7 लाख रुपये किंमतीचे सोन्या – चांदीचे दागिने व काही दस्तएवज चोरले. चोरीचा सर्व प्रकार सीसीटिव्हीत उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला.
या प्रकरणात राम उर्फ रामराजे लक्ष्मण क्षीरसागर ( रा. वाघोली जि. धाराशिव ) व राहुल उर्फ लल्या हिरामण लष्करे ( रा. गौसिया मज्जिदजवळ, काळाखडक, वाकड पुणे) येथे असल्याचे स्पष्ट झाले आहे. लातून, उस्मानाबाद, वाघोली, मुंबई, पुणे अशा ठिकाणी पोलीसांनी पथक पाठवून सदर आरोपींचा शोध घेण्यात आला.
सराईत गुन्हेगार राहुल उर्फ लल्या हिरामण लष्करे यास यापूर्वी तडीपार करण्यात आले होते. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून घटना घडल्यानंतर पळ काढला दरम्यान गुन्हे शाखा दोनच्या पथकाने पाठलाग करून दोन्ही आरोपींना गजाआड केले.
दोघांकडून सकल चौकशी केली असता, त्या दोघांनीही गुन्हा केल्याची कबुली दिली. यामध्ये दोन घरफोडीचे, चोरीचे गुन्हे आहेत. तसेच चिंचवड ,लोणीकंद ,शिरवळ पोलीस ठाण्यात या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे
या प्रकरणी अधिक तपासात त्यांनी अत्यंत चपळाईने 7 लाख रुपये किंमतीचे ऐवज त्यामध्ये 9 तोळे 300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे व 450 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, दुचाकी वाहन असा चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात करण्यात आला आहे. गुन्हयाचा अधिक तपास गुन्हे शाखा युनिट 2 कडून सुरु आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. श्री संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली
गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक श्री गणेश माने व गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अंमलदार शिवानंद स्वामी, प्रमोद चेताळ, उषा दळे, जयवंत राऊत, देवा राऊत, आतिष कुडके, अजित सानप, शिवाजी मुंढे यांनी केली आहे.