शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात नुकतेच राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष म्हणून तुषार कामठे यांना संधी देण्यात आली. दरम्यान, आज जेष्ठ नेते आजमभाई पानसरे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन जाहीर समर्थन देखील केले. यावेळी त्यांच्या समवेत तुषार कामठेही उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद मिळाल्यानंतर लगेचच तुषार कामठे यांनी पक्ष वाढीसाठी कामाला सुरुवात केली, यावेळी शरद पवार यांनी तुषार कामठे यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
गेल्या काही दिवसांपासून तुषार कामठे सतत पानसरे यांच्या संपर्कात होते. काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी तुषार कामठे आणि रविकांत वर्पे यांच्या समवेत आझम भाई पानसरे यांच्या घरी राजकारणाची खलबद्ध सुरू केली होती. पानसरे यांच्या अनेक भेटीगाठी मध्ये तुषार कामटे यांच्या सोबत सुलक्षणा शिलवंत धर, गणेश भोंडवे ,गिरीश जाधव, काशिनाथ जगताप, मुख्य प्रवक्ते माधव पाटील, राजन नायर, देवेंद्र तायडे, प्रशांत सपकाळ यांचा समावेश होता.
आझम भाई पानसरे यांना मानणारा वर्ग पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे कामठे यांच्या राजकीय खेळीने येणाऱ्या काळात पानसरे यांचा शरद पवार साहेबांना पाठिंबा भाजप आणि अजित पवार गटाचे चिंता वाढवू शकतो.