शबनम न्युज | मुंबई
राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राज्यपाल पदाची शपथ घेत, पदभार स्वीकारला आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर, राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आज रमेश बैस यांनी राज्यपाल पद स्वीकारले आहे.
Advertisement
आज त्यांचा शपथविधी संपन्न झाला. बैस हे महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी बैस यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Advertisement