शबनम न्यूज, प्रतिनिधी : मुंबई
निवडणूक आयोगाने शिवसेने संदर्भात दिलेल्या निर्णया बद्दल आज उद्धव ठाकरे यांच्या वतीने मातोश्रीवर बैठक बोलविण्यात आली आहे.
आज दुपारी एक वाजता ही बैठक होणार असून या बैठकीत आमदार खासदार पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत
निवडणूक निर्णयाच्या निकालानंतर या होणाऱ्या बैठकीत उद्धव ठाकरे आपल्या पक्षाची रणनीती ठरविणार असल्याचे सांगण्यात येत आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्ते हे आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलन करत आहे.
Advertisement