शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
तानाजी लांडगे क्रीडा संकुल कासारवाडी येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील 19 वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय भोसरी या संघाचा 24-15अशा 09 गुणांच्या फरकाने पराभव करत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद संपादन केलेले आहे.
सदर संघातील कु.ओंकार शिंदे ,कु.कृष्णा काळभोर, कु.सुभरकांत दास यांनी आक्रमक चढाया करत तसेच डावा पाचवा कोपरारक्षक कु.अनुज गावडे, उजवा पाचवा कोपरा रक्षक कु.अनिकेत तापकीर, विभांशू चव्हाण,सर्वज्ञ भोसले यांनी उत्कृष्ट पकडी घेत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. तसेच उपांत्य फेरीतील ज्ञानभक्ती ज्युनिअर कॉलेज डुडूळगांव या संघाचा 13- 8 ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सदर संघात ओंकार जगताप,सर्वज्ञ भोसले, विक्रम परमार, गणेश जाधव, साहिल यादव,श्रवण लोयरे,अनुज गावडे,ओंकार शिंदे ,कृष्णा काळभोर, सुभरकांत दास,अनिकेत तापकीर, विभांशू चव्हाण,या सर्व खेळाडूंचा समावेश होता. या सर्व खेळाडूंची अहमदनगर येथे होणाऱ्या शालेय विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे या सर्व खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष व भोसरी चे प्रथम आमदार विलासराव लांडे साहेब यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे, सचिव सुधीर मुंगसे सर, विश्वस्त व नगरसेवक विक्रांतदादा लांडे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.