शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
अनाथांसाठी १% आरक्षण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने 2018 मध्ये जाहीर केला होता, मात्र काँग्रेस आणि ठाकरे सरकार यांनी मंत्रिमंडळामध्ये झालेल्या बैठकीत १ टक्का आरक्षण ठाकरे सरकारने दिले असे जाहीर केले आहे.
मागच्या सरकारने अनाथांना आरक्षण दिले होते मग तुम्ही ते इम्प्लिमेंट करण्याऐवजी आज जाहीर का केले ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ठाकरे महा आघाडी सरकार खोटारडी व घोटाळ्यांचे व्यासपिठ आहे, हे सर्वांना माहीत आहे.
जो निर्णय 2018 मध्ये झाला तोच तुम्ही आता नवीन म्हणून सांगताय याचा काय अर्थ ? फडणवीस सरकारने केलेल्या कामावरच तुम्ही अजून नारळ फोडत आहेत व श्रेय लाटत आहेत असे आजपर्यंत देशात कुठेही घडले नव्हते मात्र ते ठाकरे सरकारच्या कालखंडात घडले याचा मात्र जाहीर आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करतो असे प्रतिपादन प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केले.