शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२६ फेब्रुवारी) :- ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कचरा वर्गीकरण, कचरा कंपोस्टिंग, सांडपाणी शुद्धीकरण, पुनर्वापर पावसाचे पाणी नियोजन आणि सौरऊर्जा वापर या नियमांचे पालन करणाऱ्या सोसायट्यांची पाहणी करून त्यांना फाईव्ह स्टार रेटींग देण्यात आले.
पिंपळे सौदागर येथे झालेल्या कार्याक्रमास आयुक्त राजेश पाटील, नगरसदस्य शतृघ्न उर्फ बापू काटे, विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसदस्या निर्मला कुटे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे सहाय्यक आयुक्त उमाकांत गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी रोझलॅन्ड रेसीडेन्सी सोसायटी, पार्क रॉयल सोसायटी आणि पलाश सोसायटीच्या पदाधिकारी आणि सदस्यांना सन्मानित करण्यात आले. आयुक्त पाटील यांनी पर्यावरण समतोल राखण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या व शहरातील इतर सोसायटींनी यापद्धतीने घनकचरा व्यवस्थापन करावे व कंपोस्टींग प्रकल्प उभारावेत असे आवाहनही केले.