शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक ३० परिसरातील रखडलेले रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा शहराध्यक्ष शेखर चंद्रकांत काटे यांनी मनपा अधिकारी यांना केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक ३० मधील उघडलेले रस्ते व खड्डे ओपन गटार दुरुस्त करणे,काँक्रीट करणे, झोपडपट्टी परिसरातील काँक्रीट चेंबर गटार दुरुस्त करणे तसेच ड्रेनेज लाईन टाकण्यात यावी, तसेच आरोग्यविषयक सार्वजनिक शौचालय साफसफाई विषयी या सर्व घटनेची दखल घेऊन त्वरित रखडलेली कामे करण्यात यावी, असेही सदर निवेदनात शेखर काटे यांनी नमूद केले आहे.
परिसरातील रखडलेले कामाचे ठिकाण –
१. नेहरू चौक, ड्रेनेज लाईन काँक्रीट करणे.
२. श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोरील रस्ता व बुद्ध विहार समोरील रस्ता.
३. फुगेवाडी विठ्ठल मंदिर समोरील रस्ता.
४. फुगेवाडी ओंकार मंडळ ते आझाद चौक रस्ता दुरुस्त.
५. फुगेवाडी महादेव मंदिर समोरील रस्ता व गटार दुरुस्त करणे.
६. दापोडी, आनंदवन, काटे वस्ती रस्ता दुरुस्त काँक्रीट करणे.
७. काटे वस्ती नाला दुरुस्त करणे
७. दापोडी गणेश हाइट्स सोसायटी समोर रस्त्याचे खड्डे व स्ट्रॉंग वॉटर चेंबर दुरुस्त करणे.
८. आतारभट्टी सरस्वती आश्रम परिसर, जाधव चाळ, पवार वस्ती, गुरव पट्टा, चेंबर लाईन व गटार टाकणे .
९. महात्मा फुले नगर,गटार ड्रेनेज चेंबर ची कामे पूर्ण करणे.
१०. पवार वस्ती ड्रेनेज लाईन टाकणे.
११. संजय नगर परिसरात गटार व ड्रेनेज लाईन टाकणे व दुरुस्त करणे.
१२. घुलेवाडी दापोडी येथील शौचालयाची दरवाजा कडे कोयंडी दुरुस्त करणे.
१३. फुगेवाडी ड्रेनेज काम करणे.
१४. फुगेवाडीत सार्वजनिक शौचालय साफ करणे
या सर्व रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी शेखर काटे यांनी आयुक्तांना केली आहे.