शबनम न्युज | पिंपरी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त ओम पॅराडाईज सोसायटी व राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन यांच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, ओम पॅराडाईज सोसायटी रहिवासी नागरिक आदी उपस्थित होते.
तसेच यावेळी बोलताना राजेंद्र तरस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने वृक्षारोपण करून खऱ्या अर्थाने महामानवाला शुभेच्छा देण्यात आल्या. निसर्गाचा होत चाललेला ह्यात लक्षात घेता अतिशय स्तुत्य उपक्रम केल्याने परिसरातील सर्व सोसायटी मध्ये असे उपक्रम राबविण्यात यावे, असे आवाहन देखील राजेंद्र तरस यांनी केले आहे. तसेच उन्हाचा पारा लक्षात घेता भविष्यात वृक्षारोपण करणे गरजेचे असून आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जयंती निमित्त आम्ही स्तुत्य उपक्रम राबविले आहे.