शबनम न्युज | पिंपरी
सर्व क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये दि.२९/०४/२०२३ रोजी महापालिकेचे सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाने अतिक्रमण धडक कारवाई केली. सदर कारवाई मध्ये हातगाडी, टपरी, टेम्पो, फ्लेक्स / बॅनर / किऑक्स, जाहिरात बोर्ड, व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
तसेच पत्राशेड निष्कासित करण्यात आले. सदर कारवाई मा. अतिरिक्त आयुक्त (१) प्रदिप जांभळे-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सर्व क्षेत्रीय अधिकारी, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, यांचे नियंत्रणाखाली करणेत आली सदर कारवाई सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण निरिक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक), मजूर व इतर मनपा कर्मचारी व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच मनपा पोलिस कर्मचारी व महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे जवान यांच्या सहाय्याने कारवाई करणेत आली. सदर कारवाई जेसीबी, ट्रक/डंपर, पिंजरा वाहने, क्रेन यांचा वापर करण्यात आला.
रहाटणी फाटा, डांगे चौक येथे झालेल्या अतिक्रमण कारवाईमध्ये 17 हातगाडी, 21 टपरी, 1 टेम्पो, 45 फ्लेक्स बॅनर , 302 किऑक्स, 27 जाहिरात बोर्ड २७, ३१ दुकानासमोरील शेड पुर्णः निष्कासित करण्यात आले.
कुणाल आयकॉन रोड, जगताप डेअरी चौक, वाकड चौक व वाकड ब्रिज खाली असलेल्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच पिंपळे सौदागर कुंजीर चौक येथे 7 मी. X5 मी. चे दोन व 10 मी.x12 मी चे दोन असे 4 आंबा पत्राशेड वर कारवाई करण्यात आली.
तीन चाकी 1 टेम्पो, 1 हातगाडी , 2 फ्लेक्स यावर कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली कार्यालयीन अधीक्षक, ८ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक,अतिक्रमण विभागाकडील मजूर १३ व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १४ जवान, २ अतिक्रमण पोलिस सहभागी होते.
कृष्णानगर पोलीस लाईन परिसर, साने चौक परिसरात रोड, फुटपाथवर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली. यामध्ये 7 मोठया टप-या , 2 बॅनर, 41 लहान टप-या, 33 अनधिकृत ओटे, 13 हातगाडी, 5 लहान शेड, 600 चौ.फुटाचे 3 शेड तसेच सानेचौक परिसरात 2500 चौ,फुटाच्या पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. जाधववाडी, कुदळवाडी आणि बो-हाडेवाडी परिसरात 18 जाहिरात फलक, 2 हातगाड़ी, 3 टपरीवर कारवाई करण्यात आली.
मोशी टोल नाका ते भारतमाता चौक परिसर डुडुळगाव परिसर आणि चरोली गाव परिसरात 9 हातगाड्या, 1 टपरी , 127 कीऑक्स 28 बॅनर हटविण्यात आले.
वल्लभनगर परिसरात 11 टपऱ्या, 3 हातगाडी, 4 फ्लेक्स आणि 29 कीऑक्सवर कारवाई करण्यात आली.
काळेवाडी येथे ८०० चौ मी अनाधिकृत पत्रशेड निष्कासित करन्यात आले . तर १ हातगाड़ीं, २ टपरी, १ फ्लेक्स, ८ कीऑक्सवर कारवाई करण्यात आली.