शबनम न्युज | पुणे
राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सल्लागार पदी अली दारूवाला यांची नियुक्ती झाल्याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी त्यांचा पुण्यात सत्कार केला.
‘अल्पसंख्याकांच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांना प्रगतीची दिशा दाखविण्यासाठी अली दारूवाला यांचे योगदान महत्वाचे ठरेल. देश बळकट करण्यासाठी त्यांनी यापुढेही प्रभावीपणे कार्यरत राहावे,’ असे उदगार डॉ. भारती पवार यांनी यावेळी बोलताना काढले.
Advertisement
हा कार्यक्रम हॉटेल जे डब्ल्यू मेरियट येथे १ मे सायंकाळी ६ वाजता झाला . यावेळी भाजपाचे संघटन सचिव राजेश पांडे हेही उपस्थित होते.