शबनम न्युज | मुंबई
“विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना महाविकास आघाडीत मुख्यमंत्री होणे शक्य नाही, त्यांना जर मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर आमच्या सोबत यावे, अजित पवारांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु महाविकास आघाडीत राहून अजितदादा कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर त्यांनी आमच्या सोबत आले पाहिजे, ते महायुती, एनडीए मध्ये आले तर भविष्यात त्यांचा विचार होऊ शकेल, असे केंद्रीयमंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांनी स्पष्टपणे सांगितले.
अजित पवार यांनी अलीकडेच एका मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याबाबत इच्छा बोलून दाखवली होती. यावर महाविकास आघाडीसह शिंदे गट आणि भाजप नेत्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यातच आता रामदास आठवले यांनी थेट शब्दात अजित पवार यांना खुली ऑफर दिली आहे. महाविकास आघाडीत राहून अजित पवार यांना मुख्यमंत्री होणे शक्य नाही, त्यांनी आमच्या सोबत यायला हवे, त्यांचा भविष्यात विचार होऊ शकेल, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे.