पिंपरी,दि. १ मे २०२३ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरवासीयांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन आज महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ वा वर्धापन दिन विविध उपक्रमाद्वारे साजरा उत्साहात साजरा करण्यात आला.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर शासन निर्णयानुसार नव्याने समाविष्ट झालेले राज्यगीत म्हणण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, सह शहर अभियंता रामदास तांबे, उप आयुक्त विठ्ठल जोशी, रविकिरण घोडके, मनोज लोणकर, संदीप खोत,मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.पवन साळवे,डाॅ.लक्ष्मण गोफणे,विशेष अधिकारी किरण गायकवाड,मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, अण्णा बोदडे,सिताराम बहुरे, वामन नेमाणे,सोनम देशमुख,विनोद जळक,मुख्य अग्निशमन अधिकारी ऋषीकेश चिपाडे,आपत्ती व्यवस्थापन अधिकारीओमप्रकाश बहीवाल,क्रिडा अधिकारी अनिता केदारी,कर्मचारी महासंघाचे नथा मातेरे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी महाराष्ट्र राज्य स्थापन करताना झालेल्या संघर्षांत मयत झालेल्या व्यक्तींप्रति कृतज्ञता व्यक्त केली. महाराष्ट्र दिनानिमित्त शहरवासीयांना तसेच कामगार दिनानिमित्त शहरातील कामगार बंधू भगिनींना यांना शुभेच्छा दिल्या.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत महाविद्यालय स्पर्धा नुकत्याच
घेण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये महाविद्यालयांमध्ये पर्यावरण संवर्धन यासाठी केलेल्या कामांचे मूल्यमापन करून स्पर्धेतील विजेत्यांची निवड करण्यात आलेली होती.या बक्षीसांचे आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते वितरण करण्यात आले,त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे रोख रक्कम ४१ हजाराचे बक्षीस पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,निगडी यांचे वतीने प्राचार्य डॉ.गोविंद कुलकर्णी यांनी स्वीकारले.तर द्वितीय क्रमांकाचे रोख रक्कम ३१ हजाराचे बक्षीस प्रतिभा कॉलेज ऑफ एज्युकेशन, चिंचवड यांनी पटकावले.
नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्पर्धेतील विजेत्यांचा देखील आज सत्कार करण्यात आला.
प्रथम क्रमांक विजेते रणजीत शानबाग यांना ४१ हजार रुपये, द्वितीय बक्षिस विजेते अरुण दिक्षित यांना ३१ हजार तर तृतीय क्रमांक विजेते शरद संकपाळ आणि पंकज इंगळे यांना बक्षीस विभागून देण्यात आले.सर्व विजेत्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.महानगरपालिकेतील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील आधुनिक उदवाहनाचे देखील आज आयुक्त शेखर सिंह यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.