शबनम न्यूज ; वृत्तसंस्था :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा मोठा निर्णय घेत असल्याचे सांगितले, शरद पवार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबई येथे संपन्न झाले या कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपला राजकीय प्रवास आपल्या भाषणातून सांगितला त्यांनी आपले भाषण सुरू करताना सांगितले की माझे घर काँग्रेसचे नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते, माझे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते, परंतु त्या काळात महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमुळे आम्ही काँग्रेसच्या जवळ जाऊ लागलो ,मी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे आकर्षित झालो ,त्यामुळे घरातील वातावरण वेगळे व माझे विचार वेगळे झाले मी काँग्रेसचा सदस्य झालो, 1967 पर्यंत मला आमदार म्हणून संधी मिळाली त्यानंतर सतत मी विविध पदांवर म्हणजेच गेली 56 वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे पण आता मी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याचे पवार यांनी सांगितले पवार यांच्या या घोषणानंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार झाल्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी घोषणाबाजी सुरू केली