शबनम न्यूज | देहूरोड
देहूरोड येथे दोन बालकांचा अपहरण झाला होता, या बालकांना 24 तासांमध्ये देहूरोड पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप दिले. 7 मे 2023 रोजी सकाळी सहाच्या दरम्यान दोन लहान मुलांचे अपहरण झाले होते. त्यानुसार देहूरोड पोलीस ठाण्यात मुलांचे पालक यांनी फिर्याद दिली होती. यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला असता, 24 तासांमध्ये बालकांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात सुखरूप दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 मे रोजी मुलांचे पालक यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, त्यांच्या मुलांचे अपहरण झाले आहे. त्यानुसार देहूरोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पथक तयार करून शोध सुरू केला असता, सर्व पथके बस स्टॅन्ड चेक करणे तसेच रेल्वे स्टेशन चेक करणे, मंदिरे चेक करण्यासाठी रवाना केली, तसेच देहूरोड पोलीस स्टेशन कडील तपास पथकाने पुणे रेल्वे स्टेशन येथे जाऊन शोध घेत असतानाच त्यांना माहिती मिळाली की, पुणे रेल्वे येथे दोन मुले ही साथी फाउंडेशन यांनी ताब्यात घेतली आहेत, अशी माहिती मिळताच साथी फाउंडेशन यांना संपर्क करून त्यांच्याकडून सदर मुलांचे फोटो प्राप्त केले असता, सदर मुले ही फिर्यादी यांची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडल डॉ.काकासाहेब डोळे, पोलीस उपायुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त देहूरोड विभाग पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, दिगंबर सूर्यवंशी, सह पोलीस निरीक्षक दिगंबर, सहायक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड ,पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर ,सामील ,प्रकाश शेजार, कानगुडे, भिसे ,बावनकर यांनी केली.