शबनम न्यूज | वृत्तसंस्था
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्सान (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इमरान खान यांना अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या आरोपाखाली त्यांच्यावर न्यायालयात हजर राहिल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.इस्लामाबाद न्यायालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती पीटीआय ने दिली आहे.
पीटीआयने जारी केलेल्या व्हिडिओत इमरान खान यांना पोलीस न्यायालयाबाहेरून अटक करून गाडीत नेताना दिसत आहेत. हा व्हिडिओ ट्विट करताना पीटीआय ने म्हटलं “ज्याला त्याच्या जीवापेक्षाही तुमच्या स्वातंत्र्याची काळजी आहे त्याच्यासाठी घराबाहेर पडा.” असे ट्विटमध्ये म्हटलेले आहे.
جس لیڈر کو اپنی جان سے زیادہ آپکی آزادی کی فکر ہے، اس کے لیے باہر نکلیں !!#نکلو_خان_کی_زندگی_بچاؤ pic.twitter.com/TKDRYFzL0r
— PTI (@PTIofficial) May 9, 2023