शबनम न्यूज | शिरूर
शिरूर मध्ये महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिरूर रामलिंग येथे राहणाऱ्या एका 33 वर्षीय महिलेने सोमवार (दि. 8) रोजी दुपारी चारच्या सुमारास राहत्या घरी सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने फाशी घेत आत्महत्या केली. अंजली ज्ञानदेव गायकवाड (वय 30, रा.रामलिंग ता. शिरूर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ज्ञानदेव आप्पासाहेब गायकवाड (रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानदेव गायकवाड यांना (दि. ८) रोजी दुपारी चारच्या सुमारास मुलगी शलाका सुपेकर (रा. श्रीगोंदा) हिने फोन करून अंजली ज्ञानदेव गायकवाड यांनी राहत्या घरी सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने फाशी घेतल्याचे सांगितले. त्यानंतर ते त्यांची पत्नी, मुलगी शलाका सोपेकर यांच्यासह शिरोळ येथील वेदांत हॉस्पिटल येथे गेले. त्यावेळी वेदांत हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांची मुलगी अंजली हिचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले.