शबनम न्युज | प्रतिनिधी
व्यावसायिकांना, वाहन चालकांना ..जीवघेणा त्रास
पिंपरी चिंचवड मध्ये आज सकाळीच पावसाळा सुरवात झाली नेहमीप्रमाणे चिंचवड लिंक रोड बिटू पेड शॉप समोर पूर्ण रस्ता पावसाच्या पाण्याने तुडुंब भरला, या मुळे वाहन चालकांना जीव घेणी कसरत करून जावे लागत होते तर व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागला सामाजिक कार्यकर्ते मधुकर बच्चे यांनी संबंधित माहिती त्वरित प्रशासन अधिकाऱ्यांना कळविली या मुळे पहाटे 5 वाजतां स्थानिक व्यवसासयिक व नागरिक सुमेध तामाने,डॉ शिंदे,सागर गदीया,आदिनी पाणी निचरा काढत वाहन चालकांना दिलासा मिळाला.
मागील पावसात या ठिकाणी मोठ्या प्रमानात पाणी साठून मोठी समस्या निर्माण झाली होती
महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे यांनी सदर माहिती प्रशासणास दिली होती व त्या परस्थितीचे गांभीर्य जाणीव करून दिली होती परंतु नेहमी प्रमाने निष्काळजी पणा व जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हा जसा त्यांचा नेहमीचा भाग झाला आहे.
निष्काळजी व दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यास कारवाई झाली पाहिजे त्याशिवाय समंधित अधिकारी तत्पर होणार नाहीत. लिंक रोड वरील समस्या कधी सुटणार या ची नागरिक वाट वाट पाहत असल्या चे या वेळी मधुकर बच्चे यांनी सांगितले