शबनम न्युज | प्रतिनिधी
गेले 15 वर्षांपासून सुरु असलेले यशवंतराव चव्हाण मेमोरीयल रुग्णालयातील एच.आय.व्ही. ग्रस्त रुग्णांचे (ART) उपचार केंद्र बंद करण्याचा घाट घातला जात आहे.हे केंद्र पीपी तत्वावर चालवले जात आहे. त्यामुळे हे केंद्र कधीही बंद पडू शकते. हे केंद्र सुरु राहावे यासाठी आज पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळाने वाय.सी. एम. चे मुख्य अधिष्ठाता डॉ.वाबळे यांच्याशी चर्चा केली.
यावेळी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांनी मागणी केली की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महाराष्ट्र सरकारच्या एड्स कंट्रोल विभागाकडे वाय.सी.एम. रुग्णालच्या एआरटी केंद्राची रुग्णांना तपासण्याची क्षमता कमी न करता वाढवावी यासाठी प्रयत्न करावेत. तसेच रुग्णांना सेवा देणारे केंद्र बंद करू नये नाहीतर या विरोधात राष्ट्रवादी आंदोलन करण्यात येईल असा इशारा या वेळी देण्यात आला
यावेळी डॉ. वाबळे यांनी हे केंद्र बंद करणार नाही असे आश्वासन दिले. काही रुग्णांना जवळच्या केंद्रात औषध उपचारांसाठी पाठवले जाईल. तसेच वाय. सी. एम.च्या या केंद्रात जिल्ह्यातीलच काय पण महाराष्ट्रातील कोणत्याही एच.आय.व्ही. ग्रस्त
रुग्णाला उपचार न देता परत पाठवले जाणार नाही, त्यांची अडवणूक केली जाणार नाही.
आज एच.आय.वी रुग्ण बांधवांना न्याय आणि साथ देण्यासाठी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे सतीश चोरमले,संजीवनी पुराणिक,शादाब खान,राजू खंडागळे,बापू सोनावणे,विवेक विधाते,सचिन जाधव,राहुल धनवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समिती सदस्य काशिनाथ जगताप उपस्तिथ होते.