शबनम न्युज | प्रतिनिधी
गणेशोत्सवपूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते दुरुस्त करावे तसेच भक्ती शक्ती चौक ते दापोडी व भक्ती शक्ती चौक नगर चौक हा रस्ता संपूर्ण डांबरीकरण करण्यात यावा त्याचप्रमाणे निगडी भक्ती शक्ती चौक ते दापोडी हा रस्ता अर्बन स्ट्रिक अंतर्गत विकसित करण्याचा अशी मागणी करणारे पत्र मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे दिले आहे दिलेल्या निवेदनात सचिन चिखले यांनी नमूद केले आहे की पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या परिसरातील निगडी भक्ती शक्ती चौक ते दापोडी हा रस्ता अर्बन स्ट्रीट अंतर्गत विकसित करण्यात यावा तसेच भक्ती शक्ती ते दापोडी हा रस्ता संपूर्ण डांबरीकरण करण्यात यावा.
निगडी ते दापोडी हा शहरातील मुख्य रस्ता असून कामगार वर्ग, विद्यार्थी वर्ग, त्याचप्रमाणे महिला वर्ग हा रस्ता वापरत असून आता सध्या ह्या रस्त्याची अवस्था खूप खराब झालेली आहे. सदर रस्ता हा दळणवळणाचा असून हा रस्ता विकसित करून सुशोभीकरण करण्यात यावा तसेच या रस्त्यावर योग्य त्या अंतरावर ठिकठिकाणी महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यात यावी अशी आपणास नम्र विनंती करीत आहे.
सदर मार्गावर ठीकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले असून त्यातून गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे, त्यामुळे लवकरात लवकर सदर मार्ग संपूर्णपणे डांबरीकरण करावा