शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘संविधान दिवस’ साजरा करण्यात येत आहे .सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपआयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसेवक मारुती भापकर , बाबासाहेब त्रिभुवन ,माजी नगरसेविका अनुराधा गोरखे , सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते तदनंतर, संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले , पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात संविधान दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले . यावेळी स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणा-या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महापालिका आयोजित आणि बानाई व रयत विद्यार्थी विचार मंच यांच्या सहकार्याने शहरातील सर्व प्रभागात संविधान संवादक अभियान उपक्रमाद्वारे संविधान रथ तसेच पथनाट्याच्या माध्यमातून भारतीय संविधानाबद्दल जनजागृती करण्यात येत आहे.