शबनम न्युज | पिंपरी
टास्क देऊन ते पूर्ण केल्यानंतर पैसे मिळतील, असे आमिष दाखवून पहिल्यांदा काही रक्कम दिली. त्यानंतर पैसे भरण्यास सांगून एका व्यक्तीची एक लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 11 मे रोजी दुपारी जाधववाडी, चिखली येथे घडली. याप्रकरणी संदीप आनंदराव पाटील (वय.40, रा. जाधववाडी चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार उर्बी पटेल, मोहित बिस्वाल, रोशन बिंदवाल, दर्शन फूड प्रॉडक्ट यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिल्या माहितीनुसार, टेलिग्राम वर फिर्यादी यांनी एका महिलेचा आयडी पाहिला. त्यात असलेल्या लिंक वर एक टास्क होता त्यानुसार, फिर्यादीने लिंक वर जाऊन हॉटेलला लाईक केले. त्यावेळी फिर्यादी यांच्या बँक खात्यात दीडशे रुपये जमा झाले. आणखी काही टास्कचे फिर्यादीला 2800 रुपये मिळाले त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला टास्कद्वारे पैसे कमावण्यासाठी पैसे भरण्यास सांगून फिर्यादीची एक लाख रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.