पुणे प्रतिनिधी :
आषाढी एकादशी व बकरी ईद लक्षात घेता आज गुरूवार दिनांक २९ जून रोजी पाणीपुरवठा सुरळीत चालू राहणार आहे. बकरी ईद व आषाढी एकादशी सण असल्यामुळे दिनांक २९ जून २०२३ वार गुरुवार या दिवशी पुणे शहराचा पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू ठेवण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाचे मा.राष्ट्रीय सरचिटणीस शेरआली शेख यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त साहेब पुणे महानगरपालिका यांच्याकडे केली होती त्यांचं या मागणीला यश आले . सध्या पाणी टंचाई भासत असल्याने मनपा वतीने पाणीकपात करण्यात येत होती या पार्शवभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाचे मा.राष्ट्रीय सरचिटणीस शेरआली शेख यांनी बकरी ईद व आषाढी एकादशी सण असल्यामुळे दिनांक २९ जून २०२३ वार गुरुवार या दिवशी पुणे शहराचा पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू ठेवण्यात यावा अशी मागणी केली होती त्यांच्या मागणीच दाखल घेत आज मनपा वतीने सुरळीत पाणी पुरवठा होत आहे या बद्दल शेरआली शेख यांनी मनपा प्रशासनाचे आभार व्यक्त केले