शबनम न्युज | मुंबई
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार भाजप सोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन करतील. आज अजित पवार यांची राजभवनात दरबार हॉल येथे शपथ विधी होणार आहे. त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्री पदाची शपथ घेणार असून अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे ४० आमदार असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील राजभवनाच्या दिशेने निघाले आहेत. तसेच, भाजप आणि राष्ट्रवादीचे काही नेते आधीपासूनच राजभवनात दाखल झाले आहेत. आमदार आदिती तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ राजभवनात उपस्थित आहे.
विशेष म्हणजे आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेस त्यांना विचारले असता, त्यांनी राष्ट्रवादीची कोणती बैठक असल्याचे मला माहित नाही, असे उत्तर दिले. राष्ट्रपती मध्ये मोठी फूट पडली आहे. आज सकाळी अजित पवार यांनी त्यांच्या समर्थकांची आमदारांची बैठक घेतली आणि हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.