शबनम न्युज | मुंबई
आज महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड झाली असून, आज पर्यंत विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनी आज राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या या शपथविधी सोहळा प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 40 आमदार उपस्थित होते.
आज रविवारी, सकाळपासूनच राजभवनात हालचाल सुरू होती. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धंनजय मुंडे, धर्मराव बाबा आत्रम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.