शबनम न्युज | मुंबई
आज महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात मोठी घडामोडी झाली असून, राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत ४० आमदार असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांच्या सोबतच राष्ट्रवादीच्या नवमंत्र्यांनी ही शपथ घेतली. यानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, आमचे सरकार हे डबल इंजन होते. आता ट्रिपल इंजन झाले आहे. त्यामुळे राज्याचा विकास हा जलद गतीने होईल व राज्य सरकारचे काम हे बुलेट ट्रेन च्या गतीने होणार आहे.
तसेच ज्यावेळी कर्तुत्ववान नेत्याला दुय्यम स्थान दिले जाते, त्यावेळी असे राजकीय बदल होत असतात, असेही एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
Advertisement