शबनम न्युज | मुंबई
आज महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप पडला आहे. आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांना पाठिंबा दिला आहे आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली प्रतिक्रिया आली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकारी, पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, युवक आणि महिला हे शरद पवार यांच्याबरोबर” असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.
तपासे म्हणाले. “राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकारी, पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, युवक आणि महिला हे शरद पवार यांच्याबरोबर आहेत. आज जो शपथविधीचा कार्यक्रम पार पडला तो ऑपरेशन लोटस चा भाग होता. त्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही, शपथ घेतली तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा उभी करणार असे महेश तपासे यांनी सांगितले आहे.