शबनम न्युज | पिंपरी
चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे अवघ्या राज्यात विरोधक आक्रमक झाले होते. पिंपरी-चिंचवडमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीने शाई फेकली आहे. आज सकाळीच पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध पक्षांनी एकत्र येऊन आंदोलन करत पाटील यांचा निषेध केला.
संबंधित व्यक्तीने थेट तोंडावर शाई फेकल्याने चंद्रकांत पाटलांचा समतोल बिघडला, हे जमिनीवर पडता-पडता थोडक्यात बचावले. हा प्रकार घडताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला पकडलं आहे. यावेळी संबंधित व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच ‘बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणाही संबंधित व्यक्तीने दिल्या.
Advertisement